०००
किन्हीराजा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : किन्हीराजा परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
०००
शिरपूर येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी ८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २६ मे रोजी पॉझिटिव्ह आला. आरोग्य विभागाच्या चमूने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
०००००
कोरोनामुळे लघू व्यवसाय ठप्प
वाशिम : कोरोनामुळे कडक निर्बंध लागू असल्यामुळे जिल्ह्यातील लघू व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर संकट ओढावले असून, शासनाने लघू व्यावसायिकांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लघू व्यावसायिकांनी मंगळवारी केली.
०००००००
मास्क न वापरल्याबद्दल दंड!
वाशिम : मास्कचा वापर न केल्याबद्दल मालेगाव वाहतूक शाखेच्या चमूने गत दोन दिवसांत जवळपास ४८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अन्यथा यापुढेही कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला.
०००
रिसोड तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ
वाशिम : रिसोड तालुक्यातील जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. पाण्याच्या शोधात हे प्राणी शेत आणि गावाकडे धाव घेत आहेत. वन्यप्राण्यांमुळे जंगल परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाल्याचे दिसून येते.
000
उड्डाणपुलाचे काम प्रभावित
वाशिम : हिंगोली-वाशिम महामार्गावर रेल्वे गेटनजीक गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले उड्डाणपुलाचे काम सद्यस्थितीत प्रभावित झाले आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण केव्हा होणार, याकडे लक्ष लागून आहे.
००००