०००
कागदपत्रांमध्ये त्रुटी, कामे प्रलंबित
वाशिम : काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने जिल्ह्यातील जवळपास १२० घरकुलांची कामे प्रलंबित राहिली आहेत. ही कामे विना विलंब पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.
0000000000000000
निजामपूर येथे आरोग्य तपासणी
वाशिम : रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य विभागाने संदिग्ध रुग्णांची तपासणी केली. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
००००
अतिक्रमणाचे सर्वेक्षण रखडले
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. यासंदर्भात सर्वेक्षणाची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र कोरोनामुळे सर्वेक्षण रखडले असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
000000000000000
शौचालय बांधकामासाठी रेती मिळेना
वाशिम : जिल्ह्यात शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे. मात्र रेतीघाट लिलाव झाले नसल्याने रेतीच उपलब्ध नाही. त्यामुळे बांधकामे प्रभावित होत आहेत. रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभार्थींमधून २ जून रोजी झाली.
०००
अनसिंग परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : अनसिंग परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
०००
रस्ता कामासाठी वृक्षांची कटई (फोटो)
वाशिम : वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालय या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यामुळे रस्ता कामात येणाऱ्या वृक्षांची कटाई केली जात असल्याचे दिसून येते.