नंदकिशाेर नारे
वाशिम : काेराेना संसर्ग कमी हाेत असला तरी प्रशासनाकडून काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आवाहनाला मात्र नागरिकांकडून खाे दिला जात असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. वाशिम शहरातील सर्वांत माेठ्या चाैकातून वाहनचालक मार्गक्रमण करीत असताना १० जणांमागे ४ जण विनामास्क दिसून आले.
.............
मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई
शहर वाहतूक शाखेतर्फे मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
आतापर्यंत काेट्यवधी रुपयांचा दंड मास्क न वापरणाऱ्यांना झाला आहे.
आजच्या घडीलाही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई माेहीम सुरू आहे.
...........
काही चाैकांतील पाेलिसांचाही मास्क ताेंडाखाली
काही चाैकांत पाेलिसांचे मास्कच ताेंडाखाली दिसनू आले.
आंबेडकर चाैक, पुसद नाका व अकाेला नाका येथे पाेलिसांचा समावेश.
पाटणी चाैकातील पाेलिसांनी रीतसर मास्क घातलेले आढळून आले.
...........
जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांवर सर्वाधिक दंड हा वाशिम शहरात करण्यात आला आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, काेणालाही साेडण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांचे आहेत. त्यानुसार दरराेज शहरातील प्रत्येक चाैकात मास्क न वापरणाऱ्या शेकडाे जणांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अधिक तीव्र करून मास्क न वापरणाऱ्यांना दंड थाेटावणार आहेत.
- नागेश माेहाेड,
शहर वाहतूक शाखा निरीक्षक, वाशिम