लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह ‘रेड झोन’ असलेल्या महानगरांमधून जिल्ह्यात परतणाऱ्या मजूर, कामगारांचे लोंढे सुरूच असून, १९ मे रोजी जवळपास ३० ते ४० वाहनांमधून ६०० ते ७०० मजूर, कामगार जिल्ह्यात परतले आहेत. मुुंबई येथून परतलेल्या मालेगाव येथील एका कुटुंबातील त्या महिलेसह एकूण सहा जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने, ‘रेड झोन’मधून येणाºया नागरिकांमुळे जिल्हाही ‘रेड झोन’मध्ये जातो की काय? अशी भीती वर्तविली जात आहे.कोरोना विषाणू संकटामुळे उद्योग, धंदे, कंपन्या लॉकडाउन झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह अन्य महानगरात उपाशी राहण्यापेक्षा गावाकडे जावे, या उद्देशातून दररोज शेकडो मजूर, कामगार विविध वाहनांमधून जिल्ह्यात दाखल होत आहेत. अनेकांकडे रितसर परवानगी तसेच फिटनेस प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. महानगरांमधून परतणाऱ्यांमध्ये गर्भवती महिला, लहान मुलांचाही समावेश असल्याने योग्य खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे. आॅटो, एसटी, ट्रक, दुचाकी यासह मिळेल त्या वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मजूर, कामगार जिल्ह्यात परतत आहेत.(प्रतिनिधी)परराज्य, परजिल्ह्यातून मजूर, कामगार, नागरीक हे जिल्ह्यात परतत आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. परजिल्हातून वाशिम जिल्ह्यात परतणाºयांनी योग्य खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर कुणाच्याही संपर्कात येउ नये. आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे.- डॉ. अंबादास सोनटक्के,जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
परजिल्हा तसेच परराज्यातून परतणाºया मजूर, कामगारांची ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांनी तपासणी करून घ्यावी.- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी,