वाशिम : विघ्नहर्ता श्री गणेशाची मंगळवारी उत्साहात स्थापना करण्यात आली. यंदा मात्र, दुष्काळी स्थितीचा या उत्सवावर परिणाम दिसून आला. यामुळे मूर्तींच्या विक्रीत ४० टक्के घट आली आहे आता शिल्लक राहिलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती वर्षभर गोदामातच सांभाळून ठेवाव्या लागणार आहेत. यंदा अधिकमासाचा योग आल्यामुळे मूर्तीकारांना श्रींच्या मूर्ती घडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. त्यामुळे संभाव्य मागणी लक्षात घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या लहान, मोठ्या आकर्षक मूर्ती घडविल्या. तथापि, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ही पर्जन्यमान घटले. परिणामी दुष्काळी स्थिती निर्माण होऊन पिकांवर आणि पर्यायाने बाजारपेठेवर परिणाम झाला. गणेशभक्तांनाही नियोजन आवरते घ्यावे लागले. त्यामुळे गणेश मूर्तीच्या विक्रीत घट आली. त्याचा फटका मूर्ती कार आणि विक्रेत्यांना सहन करावा लागला. आता शिल्लक राहिलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती त्यांना वर्षभर गोदामातच सांभाळून ठेवाव्या लागणार आहेत.
४० टक्के मोठ्या मूर्ती शिल्लक यंदा सुरूवातीला भाविकांत संचारलेला उत्साह आणि अधिक मासामुळे मिळालेला वेळ लक्षात घेऊन मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वेगवेगळ्या मोठ्या मूर्तींची संख्या वाढविली. तथापि, मागणी घटल्याने ४० टक्के मोठ्या मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत.
लहान मूर्तीची विक्रीही ३० टक्क्यांनी घटलीदुष्काळी स्थितीमुळे एककिकडे मोठ्या मूर्तींची मागणी घटली असतानाच घरगुती गणेशोत्सवासाठी वापरल्या जाणाऱ्या लहान गणेश मूर्तीची मागणीही ३० टक्क्यांनी घटल्याची माहिती मूर्ती कार आणि विक्रेत्यांनी दिली आहे.
एक लाखाची मूर्ती विकावी लागली निम्म्यापेक्षा कमी किमतीतयंदा गणेशोत्सव दणक्यात साजरा होईल अशी आशा बाळगून मूर्तीकारांनी साहित्य महागले असतानाही उत्साहाने मोठ्या मूर्तींची संख्या वाढविली. तथापि, दुष्काळी स्थितीमुळे मागणी घटल्याने एका लाखांची मूर्ती निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकावी लागल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतरही उत्सवाच्या महिनाभरापूर्वी भाविकांचा उत्साह पाहून मूर्तीची संख्या वाढविली; परंतु दुष्काळी सदृश स्थितीमुळे मागणी घटली. आता ४० टक्के मोठ्या, तर ३० टक्के लहान मूर्ती शिल्लक राहिल्याने नुकसान सहन करावे लागणार आहे. - रवि जावळे, मूर्तीकार.