शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

४० हजारांवर रुग्णांची तपासणी; ९ जण आढळले कर्करोगग्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 3:50 PM

एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४० हजार ५२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ४० हजार ५२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९ जणांना विविध स्वरूपातील कर्करोग जडल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झाली. मंगळवार, ४ फेब्रूवारीला असलेल्या जागतिक कर्करोग दिनापासून जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहभर जिल्ह्यात कर्करोग तपासणी शिबीर राबवून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. यामध्ये गावपातळीपर्यंत पोहचून ३० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींची ‘आशा’मार्फत प्राथमिक तपासणी करून संशयित रुग्णांना आरोग्य उपकेंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाईल. गर्भाशय, मुख कर्करोगाकरिता आरोग्य संस्थेमध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ असेटिक अ‍ॅसिड (व्ही.आय.ए.) ची प्राथमिक तपासणी केली जाते. व्ही.आय.ए.ची तपासणी पॉझिटिव्ह असलेल्या तसेच स्तन व मुख कर्करोगाच्या संशयित रुग्णांची जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येते. तसेच संशयित रुग्णांच्या गाठीच्या मासाचा तुकडा तपासणीसाठी पाठविला जातो.एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी ३ हजार ५६१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८६ संशयित रुग्ण आढळले. तपासणीअंती २ रुग्ण कर्करोगग्रस्त आढळले. स्तनाच्या कर्करोगासाठी १० हजार ५०८ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ संशयित रुग्ण आढळले व ५ रुग्ण कर्करोगग्रस्त आढळले. तोंडाच्या कर्करोगासाठी २६ हजार ४५९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ संशयित रुग्णांच्या संशयित गाठीच्या तुकड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २ रुग्णांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले असून कर्करोगग्रस्त सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित शासकीय व निमशासकीय कर्करोग रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झाली.

स्तनाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणेस्तनात किंवा काखेत गाठी, स्तनात सूज येणे किंवा स्तन जाड होणे, स्तनाच्या त्वचेवर सूज किंवा सुरकुत्या पडणे किंवा खळी पडणे, स्तनाग्र व स्तनावर त्वचा लालसर असणे किंवा खपली पडणे, स्तनाग्र आतमध्ये जाने किंवा आकारात बदल होणे किंवा दुखणे, स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त स्त्राव किंवा रक्तयुक्त स्त्राव निघणे, स्तनाच्या भागात किंवा काखेत सतत दुखणे ही स्तनाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणेतीन आठवड्यांपेक्षा अधिक तोंडात सतत जखमा असणे, तोंडात सतत वेदना होणे, हिरड्या, जीभ आणि घशात पांढरे आणि लाल चट्टे होणे, गळ्यात व्रण येणे किंवा आवाज घोगरा होणे, चावण्यास आणि गिळण्यास त्रास होणे, जीभ आणि जबड्याच्या हालचाली करताना त्रास होणे, मसाल्याचे पदार्थ खाताना त्रास होणे, जिभेला किंवा तोंडातील भागात रक्तस्त्राव किंवा बधिरता येणे, दातांना सैलपणा येणे किंवा जबडे आणि दात दुखणे, आवाजात बदल होणे किंवा बोलताना त्रास होणे, वजन कमी होणे, सतत अयोग्य श्वासोच्छवास, टोकदार दातांमुळे गालांना वारंवार चावल्यासारखे वाटणे ही तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.

गर्भाशयाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणेदोन मासिक पाळीदरम्यान योनीतून रक्तस्त्राव होणे, मासिक पाळी अधिक काळ असणे किंवा नियमितपेक्षा जास्त जाणे, मासिक पाळी बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होणे, दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव निघणे, असामान्य रक्तयुक्त योनी स्त्राव, कंबर दुखणे, थकवा येणे किंवा अत्यंत थकणे, कारण नसताना वजनात घट होणे, पायात दुखणे, लघवी करताना दुखणे हे कर्करोगाची लक्षणे असून ती आढळल्यास शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

 

 

टॅग्स :washimवाशिमcancerकर्करोग