लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटलची जोड देण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी अद्याप वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला नाही. परिणामी, डिजिटल शाळा संकल्पना प्रभावित होत असून, निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांनी रविवारी दिली.राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानास सुरूवात करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्याचे युग डिजिटल असल्याने शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेतील शाळेतही अशाचप्रकारे डिजिटलायझेशन अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून शाळांना डिजिटलची जोड दिली जात आहे. वर्गखोल्या डिजिटल करण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण विभागाला निधी मिळतो. सन २०१७-१८ या वर्षात जवळपास ४२ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. अद्याप शिक्षण विभागाला निधी मिळाला नसल्याने निधी कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी, संगणकाच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकाशी संबंधित भाग इंटरनेटवरून डाउनलोड करून संदर्भ म्हणून वापर करणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया मनोरंजक, हसतखेळत व दृकश्राव्य माध्यमातून अधिक दर्जेदार बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेला डिजिटलची जोड मिळणे गरजेचे आहे. संगणकाच्या सहाय्याने शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ घडविण्याकरीता व डिजिटल शाळेची संकल्पना साकारण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा निधी मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सभापती सुधीर पाटील गोळे यांनी दिली.
सर्वशिक्षा अभियानांतर्गतच्या ४२ लाख रुपये निधीची प्रतीक्षा; डिजिटल शाळा संकल्पना प्रभावित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 6:43 PM
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटलची जोड देण्यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी अद्याप वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला नाही. परिणामी, डिजिटल शाळा संकल्पना प्रभावित होत असून, निधी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे यांनी रविवारी दिली.
ठळक मुद्देनिधी मिळण्यासाठी पाठपुरावा