लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नेत्रबुबुळे संकलन केंद्र, जिल्हा समान्य रुग्णालयाच्यावतिने जिल्हयात नेत्रदान पंधरवाडयाला २५ आॅगस्टपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या पंधरवडयात ४२ व्यक्तिंनी मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र भरुन दिले असून १० मोतीबिंदु रुग्णांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. यावेळी १४२ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली.२५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्टÑीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात ३३ वा नेंत्रदान पंधरवाडा साजरा होत आहे. या पंधरवाडयानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृतीच्या हेतुने विविध कायक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . त्यासाठी २४ आॅगस्टला जिल्हा सामान्य रुगणाल वािशम येथे नेत्र शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करुण त्यामध्ये १४२ नेत्ररुग्णांची नेत्रतपासणी करून २५ आॅगस्टला १० मोतीबिंदु रुग्णावर अांतरभिगावरोपन नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्यात. सदर शिबीरात नेत्रदान महादान कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ए.व्ही. सोनटक्के तर प्रमुख उपस्थितीत नेत्र शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. चांडोळकर, डॉ. ए. सि. बेदरकर, नेत्र चिकीत्सा अधिकारी जे.एस. बाहेकर , ज्ञानेश्वर पोटफाडे, सुधिर साळवे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राऊत, ओटी सहायक अशोक घोडके, अधिपरिचारीका हजारे, अनिता साबळे, ढगे होते.कार्यक्रमाचे संचालन नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे यांनी केले . नेत्रदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन नेत्रशल्य चिकित्सक डॉ.ए.सी.बेदरकर यांनी केले . तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.व्ही. सोनटक्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचा उद्देश सांगून विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओम राउत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राउत, नेत्रचिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफाडे, सुधिर साळवे, अशोक घोडके, रामेश्वर धाडवे, पुष्पा सवाद, अधिपरिचारीका कोमल तायडे, यांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने हजर होते.
४२ व्यक्तीनी दिले मरणोत्तर नेत्रदानाचे संमतीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 3:33 PM
वाशिम : नेत्रबुबुळे संकलन केंद्र, जिल्हा समान्य रुग्णालयाच्यावतिने जिल्हयात नेत्रदान पंधरवाडयाला २५ आॅगस्टपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे राष्टÑीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात ३३ वा नेंत्रदान पंधरवाडा साजरा होत आहे. १४२ नेत्ररुग्णांची नेत्रतपासणी करून २५ आॅगस्टला १० मोतीबिंदु रुग्णावर अांतरभिगावरोपन नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्यात.