वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख४६ हजार रूपयांची थकबाकी आहे.ग्रामविकास विभागातर्फ़े २८ फ़ेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अति-तात्काळ असा शेरा असलेले पत्र देण्यात आले असून थकबाकी वसूल करण्याकडे लक्ष द्यावे, अशी सुचना करण्यात आली आहे. थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करु शकते. गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून ह्या थकबाकीचा भरणा करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.वाशिम मंडलातंर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख ४६हजाराची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदार स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणने ‘थकबाकी भरा अन्यथा नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित करु’, अशा आशयाची नोटीसही बजावली असून अनेक नोटीसेसची विहीत मुदत संपली असल्याने त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाण्याचा इशारा महावितरणतर्फ़े देण्यात आला आहे.जिल्ह्यातील ग्राहकांकडे वीजबिलापोटी असलेली थकबाकी पुर्णत: वसुल करण्यासाठी महावितरण ‘शुन्य थकबाकी’मोहीम आक्रमकतेने राबवित आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीजबिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपुर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने जानेवारीपासून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असून थकबाकीदार ग्राहकांनी त्यांचेकडील चालू वीजबिल आणि थकबाकीचा त्वरीत भरणा करून वीजपुरवठा खंडित केल्याने होणारी गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वाशिम जिल्ह्यात ७६४ पथदिवे जोडण्यांकडे ४४ कोटींची थकबाकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 5:27 PM
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख४६ हजार रूपयांची थकबाकी आहे.
ठळक मुद्देवाशिम मंडलातंर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख ४६हजाराची थकबाकी आहे.वीजबिलापोटी असलेली थकबाकी पुर्णत: वसुल करण्यासाठी महावितरण ‘शुन्य थकबाकी’मोहीम आक्रमकतेने राबवित आहे.