शेतकरी यांना पेरणीकरिता गेल्या अनेक वर्षांपासून सेवा सहकारी सोसायटीच्याअंतर्गत जिल्हा बँक शाखा, मानोरा यांच्या मार्फत पीककर्ज दिले जाते.
यंदा कोरोनाच्या पृष्ठभूमीवर कडक निर्बंध असल्याने बँक कमी वेळ सुरू आहे. तरीही कागदपत्रे जमवून पात्र शेतकरी यांनी पीककर्ज प्रस्ताव दाखल केले. बँकचे निरीक्षक यांनी तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले. निरीक्षक गोविंद आडे, विजय वानखडे, योगेश अढाऊ, पांडुरंग राऊत, दत्तात्रय पांडे यांनी कर्ज प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
...............
काेट ... यावर्षी शाखेला ६५ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. आज रोजी ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. १५ ऑगस्टपर्यंत पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरू राहाते, तोपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल.
-- ज्ञानेश्वर चव्हान
वरिष्ठ निरीक्षक, दी अकोला जिल्हा बँक, शाखा मानोरा.