मालेगाव : येथील धोटे यांच्या घरात १९ जानेवारीच्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान धारदार शस्त्रांचा धाक दाखवून ४५ हजार रुपयांची जबरी चोरी केली. याबाबत थोडक्यात वृत्त असे की, येथील रितेश नामदेव धोटे यांच्या घरात १९ जानेवारीला रात्री १२ वाजता च्या सुमारास ४ ते ५ चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील कुटुंबांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला व घरातील असलेल्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने किंमत २४,८५0 रुपये व रोख २0 हजार रुपये रोख असे एकूण ४४,८५0 चा ऐवज जबरी लुटून नेला. जबरी चोरी करताना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली; परंतु घरातील कोणत्याही सदस्याला मारहाण न करता ऐवज लुटला. यासंदर्भात रमेश नामदेव धोटे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३९४, ५0६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार तट यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करीत आहेत. या घटनेनंतर धोटे कुटुंबियात दहशत निर्माण झाली असून, शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
४५ हजारांचा ऐवज लंपास
By admin | Published: January 21, 2015 1:25 AM