लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक शेतकरी, सेंद्रिय शेती गटांना ६ जून २०१९ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे प्रस्ताव सादर सादर करावे लागणार आहेत.सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी ४६ गटांची निवड केली जाणार आहे. गटात भाग घेणाº्या शेतकº्यांनी तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहणार आहे. एका शेतकºयास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खते वापरणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. यापूर्वी सेंद्रिय शेती कार्यक्रमात भाग घेतलेले शेतकरी गट, एका गावातील पूर्ण गट हा महिलांचा होत असल्यास त्यांना प्राधान्य राहणार आहे. आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या गट अथवा समूह शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गट, संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य यांनी संसद ग्राम योजने अंतर्गत निवडलेल्या गावांमधील गटांना प्राधान्य राहणार आहे. गटात समाविष्ठ होणाºया शेतकºयांकडे किमान २ पशुधन असावे. कोरडवाहू व बागायती क्षेत्राचे स्वतंत्र गट करावे लागणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याने दरवर्षी माती, पाणी तपासून घेणे बंधनकारक राहणार आहे. इच्छुक शेतकरी गटांनी ६ जून २०१९ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर सादर करावे, असे आवाहन ‘आत्मा’ कार्यालयाच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे.
वाशिम जिल्ह्यात ४६ सेंद्रिय शेती गटांची होणार निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 2:21 PM
वाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे एका शेतकºयास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. गटात समाविष्ठ होणाºया शेतकºयांकडे किमान २ पशुधन असावे. तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहणार आहे.