‘आपले गाव, आपला विकास’ याअंतर्गत आपसातील तंटे-वाद मिटवून ग्रामपंचायत अविरोध करावी आणि त्यातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडावा या हेतूने सगळीकडे प्रसार आणि प्रचार केला गेला . याकरता आमदार अमित झनक त्यांनी २५ लाख रुपये स्थानिक निधी देण्याचे देण्याचे कबूल केले आहे .त्यानुसार मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायती पैकी १४ ग्रामपंचायतीतील काही सदस्य अविरोध झालेली आहेत . उमरवाडी आणि कोळदरा या ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य अविराेध झाले आहेत . त्यामध्ये मारसूळमध्ये २, गांगलवाडी भामटवाडीमध्ये एक , एकांबा मानकांमध्ये ५, राजुरामध्ये एक , खैरखेडा पिंपळवाडीमध्ये २ जोडगव्हाण, रामनगरमध्ये चार, वरदरी बुद्रूकमध्ये , डोंगरकिनी ,डही , कळंबेश्वर , मुंगळा प्रत्येक १, वारंगीमध्ये ४, तिवळीमध्ये ६ , वसारीमध्ये ५ सदस्यांचा समावेश आहे. वरील ग्रामपंचायतमध्ये सामंजस्याने मिळून एकच उमेदवार दिल्याने हे शक्य झाले, तर उमरवाडीमध्ये शिवाजी अमृत आजके, नंदा सतीश खुळे ,ज्योती मंगल धंदरे, विक्रम पंढरी पांडे, दिलीप नरसिंग जामकर, कमलाबाई बबन जामकर, कोळदरा येथे गजानन शिवराम शेंडे, छाया लक्ष्मण करवते, पार्वती प्रमोद जठार, आत्माराम रामजी हांडे , रेश्मा भारत हांडे, रामदास महादेव लोखंडे, मनोहर जावळे हे सर्व सदस्य अविरोध झालेले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीतील ४९ सदस्य अविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:33 AM