वाशिम : तालुक्यातील बिटोडा या गावात ५० ते ६० लोकांना विषबांधा झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार बिटोडा तेली या गावातील सतीश वंजारी यांच्या वडीलांचा गुरुवार २६ डिसेंबर रोजी तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानिमित्त गुुरुवार दुपार ते सायंकाळ पर्यंत गावकºयांनी जेवण घेतले होते मात्र शुक्रवारी पहाटे ४ वाजता पासून गावातील महीला, पुरुष , लहान बालकाना पोटात दुखने तसेच वांती होण्यास सुरुवात झाल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. विषबाधीताना लगेच मिळेल त्या वाहनाने वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील १० ते १५ लोकांना जास्त त्रास होत असल्याची माहिती असून उर्वरीत सर्व रुग्ण धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. वडीलांच्या तेरवी निमित्त गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेवण केल्यानंतर गावातील विहीरीचे पिण्याचे पाणी गावकºयांनी घेतले सदर विहीरीत बिल्चिंग पावडरचे प्रमाण अधिक झाल्यामुळे सदरचे पाणी पिण्यात आल्याने विषबाधा झाली असून गावातील ५० ते ६० लोकांचे मध्य रात्रीनंतर अचानक आरोग्य बिघडले. उपचारासाठी सर्व रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र याठिकाणी वेळेवर योग्य उपचार मिळाले नाही. बेजबाबदार पणाचा कळस आढळून आला रुग्णांच्या उपचारसाठी कर्मचाºयांचा हलगर्जीपणा दिसला.- सतिश वंजारीबिटोडा तेली
बिटोडा तेली येथे ५० लोकांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 6:47 PM