.....................
जिल्ह्यात तुटवडा, परजिल्ह्यातून आणले बियाणे
अन्य कंपनीच्या तुलनेत महाबीजच्या ३० किलो सोयाबीन बियाण्याची बॅग १,१०० रुपयांनी स्वस्त आहे. मात्र, महाबीजचे बियाणे मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. महत्प्रयास करूनही बियाणे उपलब्ध होत नसल्याने पेरणीला विलंब होऊ नये, यासाठी काही शेतकऱ्यांनी परजिल्ह्यातून सोयाबीनचे बियाणे खरेदी केले.
.....................
शेतकऱ्यांना पसंतीचे खतही मिळेना
इतर खतांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पहिली पसंती गोदावरी डीएपी या खतालाच असल्याचे यंदाही दिसून येत आहे. त्यानुसार, शेतकरी खत मिळविण्यासाठी धावपळ करित आहेत. मात्र, त्यांच्या पसंतीचे खत उपलब्ध नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
................
कोट :
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला गती दिली आहे. १८ जूनअखेर सुमारे ५० टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत हे प्रमाण शंभर टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम