लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : पैसे दामदुप्पट करून देतो, अशी बतावणी करित डोळ्यात चटणी टाकून ५० हजारांनी लुटल्याची तक्रार २१ जुलै रोजी पोलिसांत दाखल झाली. त्यावरून पोलिसांनी सहा आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी काझी नकीबोद्दीन काझी उसामोद्दीन (रा. जुने शहर, अकोला) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की २० जुलैच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील शेलगाव फाटा येथे आरोपी अकील बाबा यांच्यासह अन्य पाच अनोळखी इसमांनी संगनमतातून तुमचे पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून डोळ्यात चटणी टाकली व धक्काबुक्की करून ५० हजार रुपये लुटले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलीसांनी अकील बाबा नामक इसमासह अन्य पाच आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ४२०, ३२३, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. प्रकरणाचा पुढील तपास मंगरूळपीर पोलिस स्टेश्नचे पोलिस उपनिरीक्षक असदखाँ पठाण करीत आहेत.
डोळ्यात चटणी टाकून ५० हजारांनी लुटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:04 PM
मंगरूळपीर : पैसे दामदुप्पट करून देतो, अशी बतावणी करित डोळ्यात चटणी टाकून ५० हजारांनी लुटल्याची तक्रार २१ जुलै रोजी पोलिसांत दाखल झाली.
ठळक मुद्देआमिष दाखवून डोळ्यात चटणी टाकली व धक्काबुक्की करून ५० हजार रुपये लुटले. पोलीसांनी अकील बाबा नामक इसमासह अन्य पाच आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले.