वाशिम - वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून, २१ जूनपासून वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत निघणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे.पाच वषार्चा कालावधी संपत आल्याने तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. २१ जून रोजी अंजनखेड, चिखली खु., सापळी, सोनखास, खंडाळा खु., धानोरा बु., भटउमरा, पांडव उमरा, घोटा, राजगाव, हिस्से बोराळा, शिरपूटी, जवळा येथील ग्रामपंचायतींची वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत निघणार आहे. २२ जून रोजी सावळी, मोहजा रोड, सावरगाव बर्डे, कोंडाळा म., खरोळा, धानोरा खु., शेलगाव, बोरी बु., आसोला, गणेशपूर, वाघोली बु., वाई, चिखली बु. तर २३ जून रोजी कार्ली, सुराळा, गोंडेगाव, शेलु बु., जयपूर, नागठाणा, जुमडा, जांभरूण महाली, फाळेगाव थेट, देपूळ, सोंडा, सुकळी, धुमका येथील वार्ड निश्चितीकरण व आरक्षण सोडत निघणार आहे.
५२ ग्रामपंचायतींची वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत !
By admin | Published: June 18, 2017 7:27 PM