वाशिम: जिल्हय़ाच्या एक हजार ३५८ कोटी ४७ लाख रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यापैकी पहिल्या आर्थिक तिमाहीत जिल्हय़ातील १0७ बँकांनी प्राथमिक, अप्राथमिक तथा कृषी सलग्नीत क्षेत्रात ७१६ कोटी ७७ लाख रुपयांचा पत पुरवठा केला आहे. वार्षीक पत आराखड्याची त्याची टक्केवारी पाहता ५३ टक्याचा जवळपास हा पत पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी व कृषी सलग्न सेवांमध्ये आतापर्यंत मोठया प्रमाणावर पतपुरवठा करण्यात आलेला आहे. वार्षीक पतआराखडयाची ८0 टक्के रक्कम ही कृषी व कृषी सलग्न सेवांवर खर्च होते. एक हजार ८0 कोटी ६ लाख रुपयांची तरतुद ही खास करुन या क्षेत्रासाठी केल्या गेली आहे. वाशिम जिल्हयात फारसे उद्योग धंदे नसल्यामुळे येथील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे पतआराखडयामध्ये या क्षेत्राला प्राधान्य दिल्या गेले आहे. खरीपासाठी ७१0 कोटी ५२ लाख रुपयांचे पीककर्जाचे उद्दिष्ट जिल्हय़ाला आहे. आराखड्याच्या ५२.३0 टक्के ही रक्कम येते यावरुन जिल्हय़ाच्या कृषी क्षेत्राची व्याप्ती स्पष्ट होते. १३ जुलै अखेर जिल्हयात ७0.३७ टक्के कृषी क्षेत्रात पतपुरवठा करण्यात आला आहे. ६१६ कोटी रुपये एवढी रक्कम पीककर्ज व पीकपुर्नगठणासाठी दिल्या गेली आहे. या शिवाय शैक्षणिक व गृह कर्ज या अप्राथमिक क्षेत्रातही जवळपास ६ टक्के पतपुरवठा केला गेला आहे. कृषीशी सलग्न सेवांमध्ये शेती व शेती उपयोगी अवजारे खरेदी करण्यासाठी २0 कोटी ४ लाख रुपयांचा पतपुरवठा बॅकींग क्षेत्राने केला आहे. या क्षेत्रासाठी १९१ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद आराखडयात करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या तिमाहीत १0.४४ टक्के रक्कम या क्षेत्रावर आतापर्यंत देण्यात आली आहे. जिल्हयातील अस्थायी तथा लघु उद्योगसाठी ३८ कोटी ९ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यापैकी ४ कोटी २७ लाख रुपयांचा पतपुरवठा या क्षेत्रात करण्यात आला आहे. एकंदरीत वार्षीक पत आराखडयाचा विचार करता पहिल्या तिमाहीत ५३ टक्के आराखडयाची अंमलबजावणी झाली .
बँकांचा ५३ टक्के पत पुरवठा
By admin | Published: July 21, 2015 12:49 AM