००००
करडा परिसरात विजेचा लपंडाव
वाशिम : करडा परिसरातील गावांमध्ये विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित होत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.
०
मानधनात वाढ करण्याची मागणी
वाशिम : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर निराधार, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली.
००
गोहोगाव येथे आणखी १६ कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील गोहोगाव येथे आणखी १६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. यापूर्वीही गोहोगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वीच्या रुग्णांनी कोरोनावर मात केली.
००००
कोरोना उपाययोजनांचा आढावा
वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांना वेग देण्यासाठी शुक्रवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक होऊन चर्चा करण्यात आली.
००
जऊळका येथे आणखी एक बाधित
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २३ एप्रिलला पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. जऊळका परिसरात दररोज रुग्ण आढळून येत आहेत.
००००
पोस्ट ऑफिस चौकात दुभाजकाची गरज
वाशिम : संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक पोस्ट ऑफिस चौक परिसरात रस्ता दुभाजक टाकण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. या संदर्भात बांधकाम विभागाला गुरुवारी हुकूम पाटील तुर्के यांनी निवेदन दिले.
००
नुकसानभरपाई देण्याची मागणी
वाशिम : शिरपूर गाव परिसरात १९ ते २१ मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे विशेषत: कांदा, फळपिके व भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
०००
सिंचन विहिरींची कामे प्रभावित
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, सिंचन विहिरींची कामे प्रभावित होत आहेत. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर सिंचन विहिरींच्या कामांना गती मिळण्याचे संकेत आहेत.