वाशिम : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार असून, गत १२ दिवसात वाशिम तालुक्यात एकूण ५७ रुग्ण आढळून आले. यापैकी ३७ रुग्ण हे वाशिम शहरातील असल्याने शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते.वाशिम शहरात जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर जुलै, आॅगस्ट महिन्यातही शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. सप्टेंबर महिन्यात शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वाशिम शहरात व्यापाºयांनी सात दिवस जनता कर्फ्यूही पाळला होता. आॅक्टोबर महिन्यात कोरोनाचा आलेख खाली आहे. नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाचा आलेख बºयाच अंशी खाली आला. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार दिसून येतात. डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना रुग्ण अधिक संख्येने आढळून येत असल्याने शहरवासियांनी वेळीच सतर्क होत अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.१ ते १२ डिसेंबर या दरम्यान तालुक्यात एकूण ५७ कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये ३७ रुग्ण हे वाशिम शहरातील तर उर्वरीत २० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहून स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असतानाही स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, घराबाहेर पडताना मास्क किंवा रुमालचा नेहमी वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि हात वारंवार धुवावे, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
डिसेंबर महिन्यात सुरूवातीच्या १२ दिवसात वाशिम शहरासह तालुक्यात ५७ कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.-डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी