जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी नव्याने सहा रुग्ण आढळून आले, तर तीन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रिसोड व मंगरूळपीर तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,६३३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,९५० रुग्णांनी कोरोनावर मात केली .
................
आतापर्यंत ६२२ मृत्यू
शुक्रवारच्या अहवालानुसार ६ पाॅझिटिव्ह रुग्ण आल्यानंतर आतापर्यंत संसर्ग हाेणाऱ्याचा आकडा ४१,६३३ वर पाेहाेचला असून ६२२ जणांचा मृत्यू झाला आहे. गत आठ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण पूर्णपणे घटल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.
.............
६० सक्रिय रुग्ण
शुक्रवारच्या अहवालानुसार नव्याने सहा रुग्ण आढळून आले, तर तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृह विलगीकरणात असे एकूण ६० रुग्ण सक्रिय आहेत.