लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त १२ जुलै २०१९ रोजी भरणाऱ्या यात्रेनिमित्त नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने ११ जुलै ते १३ जुलैदरम्यान परतीच्या प्रवासासह ६ विशेष गाड्या चालवण्याचे ठरविले आहे. यातील एक गाडी अकोला-वाशिममधून धावणार असल्याने पश्चिम वºहाडातील भाविकांनाही या गाड्यांचा लाभ होणार आहे.पंढरपूर यात्रेनिमित्त दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून चालविण्यात येणाºया विशेष गाड्यांपैकी आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद (०७५०१/०७५०२) या गाडीच्या दोन फेºया होणार आहेत. त्यात ०७५०१ ही आदिलाबाद-पंढरपूर ही विशेष गाडी आदिलाबाद येथून ११ जुलै २०१९ रोजी सुटेल आणि किनवट, नांदेड, परभणी, परळी, लातूर असा प्रवास करीत पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७५०२ ही पंढरपूर ते आदिलाबाद विशेष गाडी १३ जुलै पंढरपूर येथून सुटेल आणि लातूर, परळी, परभणी, नांदेड, भोकर, किनवटमार्गे आदिलाबाद येथे पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील. नगरसोल-पंढरपूर-नगरसोल (०७५१५/०७५१६) या गाडीच्या दोन फेºया होणार आहेत. त्यात ०७५१५ ही नगरसोल-पंढरपूर विशेष गाडी नगरसोल येथून ११ जुलै २०१९ रोजी सुटेल आणि रोटेगाव, परसोडा, लासूर मार्गे औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडीमार्गे पंढरपूर येथे १२ जुलै रोजी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०७५१६ पंढरपूर- नगरसोल ही विशेष गाडी पंढरपूर येथून १३ जुलै सुटेल आणि परळी, परभणी, जालना, औरंगाबादमार्गे नगरसोल येथे १४ जुलै पोहोचेल. या गाडीला १० डब्बे असतील. त्याशिवाय अकोला-पंढरपूर-अकोला या (०७५२३/०७५२४) गाडीच्या दोन फेºया होणार आहेत. त्यात ०७५२३ ही अकोला-पंढरपूर विशेष गाडी अकोला येथून ११ जुलै रोजी सुटेल आणि वाशिम, हिंगोली, पूर्णा, परभणी येथे १२ जुलै रोजी पोहोचून तेथे ०७५१५ क्रमांकाच्या नगरसोल-पंढरपूर या विशेष गाडीला जोडण्यात येईल. पुढे ही गाडी ०७५१५ याच क्रमांकाने पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी परभणीपर्यंत ०७५१६ क्रमांकाने पंढरपूर येथून निघेल आणि परभणी येथून अकोला कडे जाणारे डब्बे वेगळे करून ०७५२४ या क्रमांकाने अकोला येथे पोहोचेल. या गाडीलाही १० डब्बे असतील.
पंढरपूर यात्रेनिमित्त नांदेड रेल्वे विभागातून ६ विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 3:40 PM