वाशिम, दि. २६- वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने एकूण ६३ चालकांचा परवाना निलंबित केला आहे. एप्रिल ते ऑगस्ट २0१६ या पाच महिन्यातील कारवाईचा हा आकडा आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने रस्ते अपघातात अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. कधी वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे तर कधी चालकाच्या निष्काळजीमुळे अपघात होतो. अनेक चालकांकडे परवाना नसतो तर परवाना असलेले अनेक चालक वाहतुकीच्या नियमांना जुमानत नाहीत. एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहिम राबवून अशा वाहनधारकांवर कारवाई केली. यामधील ६३ चालकांचा परवाना रद्द करण्यात आला. शहर व जिल्हा वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईच्या मोहिमेत सातत्य ठेवणे अपेक्षीत आहे.
६३ चालकांचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2016 2:27 AM