जिल्ह्यात सर्व मिळून जून ते सप्टेंबर अखेर ७८९ मिमी. पाऊस अपेक्षित असतो. तर जून ते २६ जुलै दरम्यान ३७०.७ मिमी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात याच कालावधीत जिल्ह्यात ५१८.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण आजवरच्या सरासरी तुलनेत १३९.८ टक्के असून, वार्षिक सरासरीच्या ६५.७ टक्के आहे. स्वतंत्र सरासरीचा विचार करता कारंजा तालुक्यात १ जून ते २६ जुलै दरम्यानच्या कालावधीत ३६६.४ मिमी. पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात या कालावधीत कारंजा तालुक्यात ३७०.८ मिमी. पावसाची नोंद होऊ शकली आहे. अर्थात आजवरच्या सरासरीपेक्षा १.२ टक्के अधिक पाऊस कारंजा पडला आहे. इतर तालुक्यात मात्र आजवरच्या सरासरीपेक्षा खूप अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत २६ जुलैपर्यंतच ६५.७ टक्के पाऊस पडला आहे. पावसाळ्याचे अद्याप दोन महिने उरले असल्याने पुढील काळात जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी भरून निघण्याची शक्यता वाढली आहे.
-------------------
गतवर्षीपेक्षा १० टक्के अधिक पाऊस
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मिमी. पाऊस अपेक्षित असतो, तर १ जून ते २६ जुलै दरम्यान ३७०.७ मिमी. पाऊस अपेक्षित असताना यंदा याच कालावधीत ५१८.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ४८१.५ मिमी. पावसाची नोंद झाली होती. अर्थात जिल्ह्यात यंदा उपरोक्त कालावधीतील अपेक्षित सरासरी पेक्षा १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात विद्यमान कालावधीत गतवर्षीपेक्षा कमी पाऊस पडला होता.
-------
पावसाची तालुकानिहाय सरासरी (१ ते २६ जुलै, मिमी.)
तालुका - अपेक्षित पाऊस - प्रत्यक्ष पाऊस
वाशिम - ४२१.६ - ५२१.०
रिसोड - ३६६.१ - ५२७.२
मालेगाव - ३७६.४ - ५३५.१
मं.पीर - ३२९.२ - ६०९.२
मानोरा - ३३७.० - ५७१.९
कारंजा - ३६६.४ - ३७०.८