शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

जिल्ह्यातील ६६ प्रकल्प तहानलेलेच!

By admin | Published: July 08, 2017 1:33 AM

२० प्रकल्पांत १० टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या मृगात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता दडी मारली आहे. त्यामुळे पिके संकटात असून, जिल्ह्यातील १२५ प्रकल्पांपैकी ६६ प्रकल्प कोरडेच आहेत. त्याशिवाय २० प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर असून, या तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पावसाची हीच स्थिती कायम राहिली, तर संबंधित गावांत पुन्हा भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात लघू आणि मध्यम प्रकल्प मिळून एकूण १२५ प्रकल्प आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात सरारीपेक्षा खूप अधिक पाऊस पडल्यानंतरही यातील निम्म्याहून अधिक प्रकल्प एप्रिल महिन्यातच कोरडे ठण्ण पडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामध्ये प्रामुख्याने रिसोड तालुक्याचा समावेश होता. या तालुक्यासह जिल्हाभरातील पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांत प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. आता यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, जमिनीची धूपच त्यामुळे कमी झाली नसल्याने जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक प्रकल्पांतील पाणी पातळीत वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून केवळ ५ टक्के जलसाठा आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यातील सर्व प्रकल्पांत मिळून ६.२१ टक्के, कारंजा तालुक्यातील प्रकल्पांत २४.८४ टक्के, मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पांत ७.९४ टक्के, रिसोड तालुक्यातील प्रकल्पांत ११.६९ टक्के, तर मानोरा तालुक्यातील प्रकल्पांत १६.४१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १८० मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात १८६.६६, रिसोड तालुक्यात १७१.९२, मंगरुळपीर तालुक्यात १६६. ६६ मिमी, मानोरा तालुक्यात १७२.१८ मिमी, तर कारंजा तालुक्यात १७५.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.