शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

गारपिटग्रस्त शेतक-यांसाठी ६८ लाखांची भरपाई !

By admin | Published: September 27, 2016 2:32 AM

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमध्ये नुकसानग्रस्त ७00 शेतक-यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.

वाशिम, दि. २६- जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च २0१६ मध्ये गारपिट व अवकाळी पावसाने फळपिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाच्यावतीने ७0७ शेतकर्‍यांना ६८ लाख ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी दिली. वाशिम जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. या गारपीटमध्ये रब्बी पिकासह भाजीपाला, फळबागा, कांदा इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५६८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने या पिक नुकसानाची पाहणी करून शासनाकडे अहवालही पाठविण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गारपिटग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार अमित झनक यांनी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे व राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते, तसेच अंदाजपत्रकीय अधिवेशनातही हा विषय उपस्थित केला होता. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकाचे फळबाग, भाजीपाला, कांदा यांचे सर्व्हेक्षण करुन नुकसानाचा अहवाल शासनास सादर करण्याबात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चाही केली होती. द्विवेदी यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्यामार्फत नुकसानाबाबतचा अहवाल शासनास पाठविला. शासनाच्या १३ मे २0१५ च्या निर्णयानुसार एसडीआरएफच्या निकषानुसार शेतकर्‍यांना शेती पिके व फळपिकांच्या नुकसानाबाबत मदत देण्यात यावी यासाठी आमदार झनक यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. ज्या शेतकर्‍यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले अशा शेतकर्‍यांना बागायती क्षेत्राखालील पिकांसाठी १३ हजार ५00 रुपये प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकासाठी १७ हजार रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे. वाशिम जिल्हयातील ३३ टक्के पेक्षा जास्त ४५८ हेक्टर मध्ये नुकसान झाले असून बाधीत शेतकर्‍यांची संख्या ७0७ आहे. त्यात रिसोड तालुक्यातील अंचळ, नेतन्सा, नावली, कोयाळी बु, कळमगव्हाण व केनवड तर मालेगाव तालुक्यातील आमखेडा, दुबळवेल, पिंपळ व मसलाखुर्द या गावाचा सामावेश आहे. वाशिम जिल्हयातील सर्व पात्र शेतकर्‍यांना ६८ लाख ४९ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली असून तहसिल कार्यालयामार्फत शेतकर्‍यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. या रकमेमधून कोणत्याही बँकानी वसूली करु नये असे शासनाच्या आदेशात आहे.