वाशिम : वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी अजुनही ७ कोटी रुपयांची आवश्यकता असुन त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले असल्याची माहिती रिसाडचे युवा आमदार अमित झनक यांनी दिली. यावेळी आमदार झनकांसह आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२००९ -१० मध्ये तत्कालीन महिला व बालविकास मंत्री आम.सुभाषराव झनक यांनी महिलांना स्वतंत्र्य चांगल्या आरोग्यसेवक मिळावी यासाठी वाशिम येथे जिल्हा स्त्रियांचे १०० खाटांचे रुग्णालय मंजुर करुन घेतले होते. त्यावर लागणारा निधी सुध्दा उपलब्ध करुन घेतला होता. स्त्री रुग्णालयाच्या कामाला २०१२ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. परंतु ६ वर्षाचा कालावधी उलटुनही रुग्णालयाची इमारत बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे रिसोडचे युवा आमदार अमित झनक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तांराकीत प्रश्न उपिस्थत केला होता. त्यावर आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी येत्या चार महिन्यात वाशिम येथील स्त्रीयांचे रुग्णालय सुरु करण्यात येईल व त्यासाठी १५ दिवसात संबंधीत अधिकाऱ्यां ची मंत्रालयात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी ६ एप्रिलला मंत्रालयातील त्याच्या दालनात आमदार अमित झनक यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यां ची बैठक घेतली.बैठकीतील चर्चेनुसार आमदार झनक यांनी लिप्ट विद्युतीकरण, फायद सेप्टी, शस्त्रक्रिया कक्षाचे वाताणुकीत यंत्रणा ड्रेनेज व सिव्हील ची कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणुन दिले. तेव्हा कार्यकारी अभियंता, सार्व.बांध विद्युत अमरावती यांनी लिफ्ट, वातानुकूलीत यंत्रणा व फायर सेफ्टी साठी ९० लाखाची आवश्यकता असुन त्याशिवाय उद्घाटनचे कामास सुरुवात करण्यात येवुन शकत नसल्याचे स्पष्ट केले . तर कार्यकारी अभियंता सा.बां.वाशिम यांनी सिव्हील कामासाठी २ कोटीची आवश्यकता असुन त्याबाबतचा प्रस्ताव सुध्दा पाठविला असल्याचे सांगितले. पाणी टंचाई लक्षात घेता सदर रुग्णालयासाठी अतिरिक्त व्यवस्था सुध्दा उभारण्याची गरज असल्याचे कार्यकारी अभि. महा.जीवन प्राधीकरण वाशिम यांनी सांगितले. त्यासाठी जवळपास २५ लाखाची गरज आहे. स्त्रियांच्या रुग्णालयासाठी उपकरणे , कॉट, गाद्या ,चादरी इत्यादीकरिता ३ कोटी लागणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले. एकंदरीत जिल्हा स्त्रियांचे रुग्णालय कायान्वीत करण्यासाठी ७ कोटीची आवश्यकता असल्याची सत्य परिस्थिती बैठकीत निदर्शनास आली . आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी स्त्रियांचे रुग्णालय वाशिम येथील उर्वरीत कामे ेपूर्ण करण्यासाठी लागणारा ७ कोटी निधीची तरतुद करण्याचे निर्देश संबंधीत अधिकाºयांना दिलेत. त्याच प्रमाणे वाशिम येथील शासकीय नर्सिंग स्कुल व होस्टेलचा विषय सुध्दा आम.अमित झनक यांनी उपस्थित केला असता नर्सिग स्कुलसाठी ४५ लाख तर होस्टेलसाठी ६ कोटीची आवश्यकता आहे.मांगुळ झनक येथील ग्रामीण रुग्णालया संदर्भात जागा ताबा घेण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत. वाशिम जिल्हयातील नवीन प्राथ. आरोग्य कें द्र व उपकेंद्र निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडुन आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे, परंतु अद्यापही शसनस्तरावर निर्णय प्रलंबीत असल्याचा प्रश्न आम.झनक यांनी उपस्थित केला.त्यावर प्राथ. आरोग्य केंद्र व उपकेंद्र निर्मितीसाठी राज्याचा बृहत आराखडा तयार करण्यात येत असुन ३ महिन्यात बृहत आराखड्यास मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयात झालेल्या बेठकीस आमदार अमित झनक ,प्रधान सचिव आरोग्य सेवा, आयुक्त्, आरोग्यसेवा, सहसचिव, आरोग्य सेवा, उपसंचालक, अकोला, शल्य चिकित्सक वाशिम, कार्यकारी अभियंता सार्व.बांध, वाशिम, कार्य.अभिय.सार्व.बांध विद्युत अमरावती, कार्य.अभि.महा.जिवन प्राधीकरण उपविभाग. अभियता सा.बां.वाशिम उपस्थित होते.