शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

शुल्क परताव्याचे ७0 लाख होणार खात्यात जमा!

By admin | Published: May 09, 2017 2:13 AM

संस्थाचालकांच्या आंदोलनाचे फलित : सीईओंशी सकारात्मक चर्चा

वाशिम : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार्‍या जिल्हय़ातील ४४ शाळांना सन २0१४-१५ पासून शुल्क परतावा मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित संस्थाचालकांनी सोमवार, ८ मे रोजी जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन २0१४-१५ चे ७0 लाख रुपये विनाविलंब संस्थाचालकांच्या खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन मिळाल्याने या प्रश्नावर काहीअंशी तोडगा निघाला.इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणार्‍या जिल्ह्यातील ४४ शाळांना गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. त्यामुळे यंदा ही रक्कम तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संस्थाचालकांनी मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य ज्योती गणेशपुरे यांनी मध्यस्थी करत मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी २0१४-१५ च्या शुल्क परताव्याची ७0 लाख रुपये रक्कम विनाविलंब संस्थाचालकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अवलंबिण्याचे निर्देश पाटील यांनी दिल्यामुळे संस्थाचालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.