शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

वाशिम जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी लाभार्थींना मिळणार धान्याऐवजी पैसे

By दिनेश पठाडे | Published: March 01, 2023 5:57 PM

शेतकरी कुटुंबांना दिलासा: एपीएलचे १८२९९ कार्डधारक

दिनेश पठाडे, वाशिम: राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण केली करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारी रोजी घेतला आहे. त्यात वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश असून जिल्ह्यातील १८ हजार २९९ कार्डवरील ७० हजार २५२ लाभार्थींना धान्यऐवजी पैसे मिळणार असून प्रती लाभार्थी १५० रुपये त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. जानेवारी २०२३ पासून लाभ दिला जाणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एनएफएसए योजनेंतर्गत गहू २२ रुपये प्रती किलो व तांदुळ २३ रुपये प्रती किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदुळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने ३१ मे २०२२ आणि १ सप्टेंबर २०२२ रोजी पत्राद्वारे कळवले होते. ही बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

या योजनेचा हजारो लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबत सर्व तालुका पुरवठा विभागांना १ मार्च रोजी सूचना निर्गमित केल्या आहेत.

एपीएल शेतकरी योजना तालुकानिहाय लाभार्थी

तालुका--कार्ड संख्या--लाभार्थी संख्या

वाशिम -३२२०--१३४२४मालेगाव--२७९४--१०१२०रिसोड--२०९४--७५६९मंगरुळपीर--५१३७-१८४१६कारंजा--३८०२--१६२१३मानोरा--१२५२--४५१०

लाभार्थींना करावा लागणार अर्ज

रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळण्याकरिता आरसीएमएस वर नोंद असलेल्या संबंधित पात्र शिधापत्रिकारधारकांना डीबीटी साठी आवश्यक असलेला बँक खात्यांचा तपशिलासह ऑफलाइन अथवा ऑनलाइन अर्ज पुरवठा विभागाकडून करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करुन आधार लिंक असलेल्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीwashimवाशिम