वाशिम : संमतीपत्र प्राप्त झालेल्या ७३ शाळांची पहिली घंटा १५ जुलै रोजी वाजली असून, इयत्ता आठवी ते बारावीच्या वर्गात एकूण १८०२ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसगार्मुळे प्रत्यक्ष शिक्षणासाठी शाळेचे वर्ग बंदच आहेत. यंदाही विद्यार्थ्यांसाठी २८ जून रोजी शाळा सुरू झाल्या नाहीत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने स्थानिक प्रशासन, ग्रामस्तर समिती व पालकांची संमती मिळाल्यानंतर इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले असून, संमतीपत्र मिळालेल्या ७३ शाळा पहिल्या दिवशी उघडण्यात आल्या. जिल्ह्यात २७५ शाळा असून, उर्वरित २०३ शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींचे ठराव न आल्यामुळे त्या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. पहिल्या दिवशी १८०२ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. २९०६ शिक्षकांपैकी पहिल्या दिवशी १०१६ शिक्षक हजर होते.
०००००
पहिल्या दिवशी सुरू झालेल्या शाळा व उपस्थित विद्यार्थी
तालुकाशाळाविद्यार्थी
कारंजा ३० २२४
मालेगाव २२ ९१४
मं.पीर ०४ १३०
मानोरा ०२ ५१
रिसोड १२ ३९७
वाशिम३ ८६
००००
कोट
इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, पहिल्या दिवशी संमतीपत्र प्राप्त झालेल्या ७३ शाळा उघडण्यात आल्या. शाळा सुरू होण्याचे प्रमाण वाढविण्याचे नियोजन आहे.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)