वाशिम : शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या शिक्षण घेणाºया जिल्हयातील १.३८ लाख विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ७.५४ लाख मोफत पाठयपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली होती. २५ जूनपर्यंत ७.४० लाख पुस्तके प्राप्त झाली असून, २६ जून रोजी उपस्थित विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ५४ हजार १६ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती. यामध्ये कारंजा तालुक्यातील २१ हजार ७५२ विद्यार्थ्यांना एक लाख २० हजार ५९४ पाठ्यपुस्तके, मालेगाव तालुक्यातील २१ हजार २६९ विद्यार्थ्यांना एक लाख १३ हजार ९४० पाठ्यपुस्तके, मंगरूळपीर तालुक्यातील १८ हजार ६४० विद्यार्थ्यांना एक लाख २ हजार ३२७ पाठ्यपुस्तके, मानोरा तालुक्यातील १७ हजार ४७० विद्यार्थ्यांना ९२ हजार ७९९ पाठ्यपुस्तके, रिसोड तालुक्यातील २७ हजार ६३१ विद्यार्थ्यांना एक लाख ५१ हजार ६५२ पाठ्यपुस्तके तर वाशिम तालुक्यातील ३१ हजार ५९९ विद्यार्थ्यांना एक लाख ७२ हजार ३४४ पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे. २५ जूनपर्यंत जिल्ह्याला ७.४० लाख पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून, संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांमार्फत मुख्याध्यापकांकडे सदर पाठ्यपुस्तके सुपूर्द करण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशी अर्थात २६ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात ७.५४ लाखांपैकी ७.४० लाख मोफत पाठ्यपुस्तके प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:37 PM
२५ जूनपर्यंत ७.४० लाख पुस्तके प्राप्त झाली असून, २६ जून रोजी उपस्थित विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.
ठळक मुद्दे२६ जून रोजी उपस्थित विद्यार्थ्यांना या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्येनुसार सात लाख ५४ हजार १६ पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली होती.