लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग सहावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हाभरातून सोमवार १६ सप्टेंबरपर्यंत ७५४० विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जवाहर नवोदयची परिक्षा ११ जानेवारीला होणार असून, त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या प्राप्त लॉगिन आयडी क्रमांकानुसार पालकांना संबंधित संकेतस्थळावरून परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहेत. दरम्यान, या परिक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.दरवर्षी प्रमाणे यंदाही जवाहर नवोदय विद्यालय समितीच्यावतीने सहावीच्या प्रवेश प्र्रक्रियेसाठी मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. यानंतर आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली असून, १६ सप्टेंबरपर्यंत या परिक्षेसाठी जिल्हाभरातील ७५४० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, अर्जाची मुदत वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत करण्यात आल्याने यात आणखी वाढ होणार आहे. जवाहर नवोदय विद्यालयात २०२० साठी सहाव्या वर्गातील परिक्षेचे परिक्षा प्रवेशपत्र जवाहर नवोदय विद्यालय समितीच्यावतीने आॅनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जारी केले जाणार आहेत. ज्या उमेदवार विद्यार्थ्यांचे आॅनलाइृन अर्ज निर्धारित वेळेत सादर करण्यात आले आहेत. त्या सर्वांना परिक्षा प्रवेशपत्र मिळणा आहेत. सर्व विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या ‘नवोदयडॉटगव्हडॉटइन’वरून परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येतील. परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची प्रत काढून घ्यावी लागेल. जवाहर नवोदय विद्यालय निवड परिक्षेत सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्राव परिक्षा प्रवेशपत्र घेऊन जावे लागेल. जवाहर नवोदय विद्यालयाचे परिक्षा प्रवेशपत्र १ डिसेंबर २०१९ रोजी जारी होणार असून, पहिल्या टप्प्यातील परिक्षा ११ जानेवारी रोजी होणार आहे. दुसºया टप्प्यातील परिक्षा प्रवेशपत्र १ मार्च रोजी जारी होणार असून, ११ एप्रिल रोजी परिक्षा होणार आहे.
जवाहर नवोदय वाशिमसाठी ७५४० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 5:47 PM