लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील केकतउमरा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक शनिवार, २७ मे रोजी शांततेत पार पडली. २९ मे रोजी मतमोजणी होणार असून, आता ग्रामस्थांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. जून ते सप्टेंबर २0१७ या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींमध्ये मोडणार्या केकतउमरा ग्रामपंचायतीमधील ११ सदस्यांकरिता २७ मे रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ६.३0 या कालावधीत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. तालुक्यातील तुलनेने मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्या केकतउमरामधील ही निवडणूक यंदा अनेकांनी प्रतिष्ठेची केली हो ती. प्रचारकार्यातही दिग्गज उमेदवारांनी आघाडी घेतली. मतदारांची मनधरणी करण्यासाठी यंदा वेगवेगळ्या स्वरूपातील क्लृप्त्या अवलंबिण्यात आल्या होत्या. असे असले तरी शेवटच्या टप्प्यात कोणता उमेदवार पसंतीस उतरला आणि कोणी कोणाला मतदान केले, हे ह्यइव्हीएमह्ण यंत्रात बंद झाले असून, २९ मे रोजी निकालानंतर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते आणि कुणाला पराजयाचा सामना करावा लागतो, याकडे केकतउमरा येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
केकतउमरा येथे ७६ टक्के मतदान!
By admin | Published: May 28, 2017 4:04 AM