करंजा लाड : तालुक्यात सन २०१५ पासून २२ जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. यामधील ४२ शेतकरी आत्महत्या शासन दरबारी पात्र ठरल्या असून, विविध त्रुटी व कारणांमुळे ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. ३ शेतकºयांच्या आत्महत्या यादीतून वगळल्या असून, १ शेतकरी आत्महत्या प्रकरण चौकशीत आहे.
कारंजा तालुक्यात सन २०१५ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यापैकी २० पात्र तर १२ अपात्र ठरविण्यात आल्या. २०१६ मध्ये २२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी १३ पात्र तर ९ अपात्र ठरविल्या गेल्या. सन २०१७ मध्ये २२ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली . त्यापैकी ९ पात्र, १० अपात्र तर ३ आत्महत्या वगळल्या गेल्या व १ आत्महत्या चौकशीत असल्याची माहिती तहसिल कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. भारत हा कृषी प्रधान देश असून, देशातील ८० टक्के लोक शेती किंवा शेतीशी निगडीत व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. पूर्वी शेतकरी हा पारंपारिक शेती करून शेतीत निघेल तेवढ्या उत्पन्नावर आपला चरितार्थ भागवत होता. परंतू अलिकडच्या काळात शेतीचे यांत्रिकीकरण झाले आणि शेती उत्पादनासाठी लागणारा खर्चही वाढला. अलिकडील पावसातील अनियमितता, खंड, बदलते वातावरण, व निसगार्चा लहरीपणा या ना अनेक कारणांमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असून, कधीकधी तर उत्पादन घेण्यासाठी लागलेला खर्चही निघणे कठीण होवून बसले आहे. शेती या व्यवसायात उत्पन्नाची हमी नसून देखील पर्याय नाही म्हणून ंिकंवा वडीलोपार्जित शेती आहेत म्हणून शेती केल्या जाते. यासाठी कधी बँकांचे तर कधी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवून शेती मशागत व बी बीयाणे साठी पैसा उभा केल्या जातो. शेतकºयांचे कुटुंब हे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने मुलांचे शिक्षण, मुलामुलीचे विवाह, दवाखाना, आणि चरितार्थ असे सर्वच शेतीतून मिळणाºया उत्पन्नावर भागविले जाते. परंतू अलिकडे होत असलेली नापिकी, कजार्चा वाढलेला डोंगर, या विवंचनेतून बळीराजा जगण्यापेक्षा मृत्यू बरा असे समजून आत्महत्या करित आहे. कारंजा तालुक्यात सन २०१५ पासून जानेवारी २०१८ पर्यंत एकुण ७७ शेतकरी व शेतकरी पुत्रांनी मृत्यूला कवटाळले आहे. शेतकरी आत्महत्येकरिता शासनाकडून १ लाख रूपयांचे अर्थ ाहाय केल्या जाते. तहसिल कार्यालयामार्फत शेतकरी आत्महत्येचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला जातो. त्यानंतर जिल्हाधीकारी कार्यालयाच्या समितीमार्फत आत्महत्या पात्र की अपात्र ठरविल्या जाते. शासनाकडून दिल्या जाणाºया १ लाख रुपए अर्थसहायापैकी ३० हजार रूपयांचा धनादेश जवळच्या नातेवाईकाला देण्यात येतो. तर उर्वरित ७० हजार रुपये पोस्टात खाते काढून त्यामध्ये टाकले जातात. जमा रकमेवर मिळणाºया व्याजावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा हा या मागील हेतू आहे.