यावेळी शिबिर उद्घाटन कार्यक्रमाला कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव शिरीष चवरे, गोपाल पाटील भोयर, डॉ. अजय कांत, डॉ. शार्दुल डोणगावकर, डॉ. उल्हास काटोले, संत गाडगेबाबा रक्तपेढीचे डॉ. अनिल कविमंडन, देवव्रत डहाके, मुख्याध्यापक उदय नांदगावकर, अनिता चोपडे, विदर्भ कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव शेखर बंग उपस्थित होते.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, माजी सैनिक संघटना,कारंजा एज्युकेशन सोसायटी, जिव्हाळा परिवार कारंजा, महेश सेवा समिती, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर, पूज्य सिंधी पंचायत, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), कारंजा डॉक्टर्स असोसिएशन, कारंजा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, कारंजा पत्रकार संघ, भारतीय जैन संघटना, कारंजा रक्तदान चळवळ, दी वाशिम जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, कारंजा या सहयोगी संस्थेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिर झाले. एकूण ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. आमदार राजेंद्र पाटणी यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. डॉ पंकज काटोले, डॉ. राम गुंजाटे, डॉ . जवाहरमलानी, डॉ गिडवाणी , डॉ. अमोल उगले, डॉ. सारडा, डॉ. मिसाळ ,डॉ. प्रज्ञाताई पाटील , डॉ. वैशालीताई देशपांडे , डॉ. घुडे तसेच कारंजा तालुका केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य, क्रीडा अधिकारी किशोर बोडे यांनी शिबिराला भेट दिली.
सामाजिक जबाबदारी म्हणून किशोर धाकतोड यांचे आजचे ६१ वे रक्तदान व उमेश माहितकर यांचे ३२ वे रक्तदान हाेते. शिबिरात ७ महिलांनी रक्तदान केले. शिबिरादरम्यान सहयोगी संस्थेचा सर्व सभासदांसहीत शहरातील मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहयोगी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, कारंजा एज्युकेशन सोसायटीचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पांडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुशील देशपांडे यांनी तर आभार आशिष बंड यांनी मानले