मानोरा, दि.२ : तालुक्यातील वंचित पिक विमा १७ हजार ७६२ शेतकऱ्यांना सोयाबीन व कपाशी पिकासाठी शासनाकडून ८ कोटी ४२ लाख २१ हजार २४० रुपये रक्कमेच्या पिक विम्याचा लाभ मिळणार आहे. सदर रक्कम बॅकेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी अदा करण्यात आल्याची माहिती तहसिलदार शेख एफ.आर. यांनी बुधवारी दिली. सविस्तर असे की सन २०१५ -१६ मध्येखरी पहंगामात सायेबीन कपशीचा पिक विमा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना याआधी पिक विम्याचा लाभ देण्यात आला आहे. यावेळी ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला नाही त्या शेतकऱ्यांना ५० टक्के पिक विमा देण्याचा आश्वासन शासनाच्यावतीने देण्यात आले होते. त्याची पुर्तता म्हणून शासनाच्यावतीने सोयाबीन खातेदार १६ हजार ९९९ शेकऱ्यांना ८ कोटी २१ लाख १३ जार रुपये तर कपाशी खातेदार ७६३ शेतकरकयांना ५० टक्के रक्कम याप्रमाणे २० लक्ष ७० हजार २२७ रुपय रक्कम महसूल विभागला प्राप्त झाली आहे. सदर रक्कम बँकेत जमा करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम टाकण्याकरिता तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या खाते क्रमाकाची यादी सुद्धा बँकेला सुपूर्द केली आहे याबाबत शेतकऱ्यांनी बूंक शाखेत चौकशीा करुन बँक खात्यात रक्कम जमा करीता खात्री करावी अशी माहिती सुद्धा शेख यांनी दिली आहे.
पीक विम्याचे साडे आठ कोटी बँकेत जमा!
By admin | Published: March 03, 2017 1:02 AM