लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम तसेच जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा न्यायालय, वाशिम येथे चाललेल्या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीत ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले. या कौटुंबिक वाद प्रकरणांच्या पूर्व बैठकीला सर्व न्यायालयीन पदाधिकारी, जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिमचे अध्यक्ष अजयकुमार बेरीया, प्रा. हरीभाऊ क्षीरसागर, वकील मंडळी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. हरीभाऊ क्षिरसागर यांनी कौटुंबिक वाद या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता तीन पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलवर सर्वश्री अॅड. पडधान, अॅड.काळू, अॅड. पी.एस. देशमुख व मनिषा दाभाडे, वनमाला पेंढारकर, पाठक यांनी मध्यस्थाची भूमिका वठविली व समुपदेशन केले. तीन पॅनलवर जवळपास ६० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी समुपदेशनाव्दारे ८ प्रकरणात समुपदेशन यशस्वी झाले. समुपदेशनाव्दारे अनेक प्रकरणात तडजोड होणे शक्य झाले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी.देशपांडे यांनी आभार मानले. ८ डिसेंबर रोजी होणाºया राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणात आपसी समेट घडवून तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन सचिव देशपांडे यांनी केले.
८ कौटुंबिक प्रकरणांचा सामोपचारातून निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 3:25 PM