जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, रिसोड व मंगरूळपीर तालु्क्याचा अपवाद वगळता उर्वरित तीन तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,६४५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०,९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंंत ६२२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
तीन तालुके निरंक
सोमवारच्या अहवालानुसार मालेगाव, मानोरा व कारंजा तालुक्यात तसेच वाशिम, मंगरूळपीर व रिसोड शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही. सोमवारीदेखील जिल्ह्यातील एकाही प्रमुख शहरात कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
०००००००
४९ सक्रिय रुग्ण
सोमवारच्या अहवालानुसार नव्याने ४ रुग्ण आढळून आले तर ८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४९ रुग्ण सक्रिय आहेत.