वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या शेतकरी आत्महत्या या विषयावरील बैठकीत ठेवण्यात आलेल्या २५ पैकी ८ प्रकरणे निकाली काढून पात्र ठरविण्यात आली. आत्महत्या शेतकर्यांचे ठेवण्यात आलेल्या २५ पैकी १६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर एक प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून आमदार, सर्व पंचायत समिती सभापती व शासनाने नेमलेले प्रतिनिधी अशी मिळून ही सर्व समिती असते. लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदार संघातील प्रकरणे निकाली काढण्यासाठी बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक असते; परंतु बहुतांश बैठकीला लोकप्रतिनिधी गैरहजर असतात. वाशिम जिल्हा हा शेतकरी आत्महत्येच्या यादीमध्ये पुढे आहे, अशा परिस्थितीत लोक प्रतिनिधींनी दक्ष राहण्याचे गरजेचे आहे.
२५ पैकी ८ प्रकरणे निकाली
By admin | Published: November 28, 2015 2:44 AM