शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
4
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
5
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
6
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
7
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
8
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
9
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
10
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
11
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
12
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
13
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
14
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
15
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
16
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
17
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
18
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
19
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
20
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

वाशिम जिल्ह्यातील ८० दुकाने केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:13 AM

80 shops closed in Washim district आस्थापनांची तपासणी सुरू झाली असून आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार - ८० दुकाने बंद करण्यात आली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्व आस्थापनाधारकांनी २५ मार्चपर्यंत कोरोना चाचणी करून घ्यावी, कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांच्या आस्थापना २६ मार्चपासून बंद करण्यात येतील, असे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले होते. त्यानुसार, आजपासून कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. शहरी व ग्रामीण भागात आस्थापनांची तपासणी सुरू झाली असून आज मालेगाव, कारंजा, शेलूबाजार - ८० दुकाने बंद करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारक, व्यावसायिक यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार २१ मार्चपर्यंत सर्व आस्थापनाधारकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली होते. कोरोना चाचणी न केल्यास संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर ही मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली. त्यानुसार आता जिल्ह्यातील कोरोना चाचणी न केलेल्या आस्थापनाधारकांची दुकाने, आस्थापना बंद करण्याची कारवाई प्रशासनाने सुरु केली आहे. आज मालेगाव शहरातील ३२, कारंजा शहरातील ९, मंगरूळपीर शहरातील ३८ व शेलूबाजार - १ आस्थापना बंद करण्यात आली.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आस्थापना, दुकानांच्या तपासणीसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. शुक्रवारपासून ही पथके जिल्हाभरातील आस्थापनांची तपासणी करुन कोरोना चाचणीचे प्रमाणपत्रांची पाहणी करणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक