शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

वाशिम जिल्ह्यात ८६ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Published: January 07, 2015 1:06 AM

मागील वर्षातील शेतक-यांच्या ४७ आत्महत्या अपात्र.

वाशिम : नापिकी, कर्जबाजारीसह विविध कारणांमुळे गत वर्षात जिल्हय़ातील ८६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. सन २00१ ते २0१४ पर्यंंत एकूण ११३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ११३८ शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ ४0९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतांनाच दिसून येत आहेत. त्यामध्ये शासनाच्यावतीने शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविल्या जात आहेत. सन २00१ पासून तर २0१४ पर्यंंत झालेल्या ११३८ शेतकरी आत्महत्यापैकी ४0९ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. गतवर्षी नापिकी, सावकारी कर्ज, बँकेचे कर्ज यासह विविध समस्यांचा सामना करताना हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये सन २00१ ते २00८ पर्यंंत ५७७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. तर २00९ ते २0१४ पर्यंंत एकूण ५६१ असे एकूण १४ वर्षात ११३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. यामध्ये २00९ मध्ये एकूण १२१, २0१0 मध्ये १२२, २0११ मध्ये ८९, २0१२ मध्ये ८३, २0१३ मध्ये ६0 तर २0१४ मध्ये ८६ शेतकर्‍यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असताना शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत असून, यावर प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.*गत ५ वर्षात सर्वाधिक आत्महत्या सन २0१0 मध्ये शेतकरी आत्महत्यांच्या गत ५ वर्षातील घटना पाहता सन २0१0 मध्ये सर्वाधिक १२२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. शासनाने यामधील मात्र केवळ २८ शेतकरी आत्महत्याच पात्र असल्याचे ठरविले. इतर ९४ आत्महत्या अपात्र ठरविल्यात.