लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदविका किंवा पदवी नसतानाही जिल्हय़ातील ९५ प्रशिक्षित शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा पदवी प्राप्त करावी लागणार असून, शिक्षण शास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १५ सप्टेंबर २0१७ ही अंतिम मुदत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक हे शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा पदधीधारक असणे बंधनकारक आहे. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसह खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळेमध्ये सक्षम प्राधिकार्यांनी यापूर्वी पदवीधर किंवा अन्य शैक्षणिक पात्रता धारण करणार्या उमेदवारांना शिक्षक म्हणून मान्यता दिली. जिल्हय़ात एकूण ९५ अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक आहेत. शिक्षण शास्त्रातील डी.टी.एड. किंवा बी.एड. ही अनुक्रमे पदविका व पदवी नसतानाही प्राथमिक शिक्षक म्हणून वैयक्तिक मान्यता प्रदान केलेल्या या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना राज्य शासनाच्या पत्राद्वारे प्रशिक्षण योजनेमध्ये अथवा नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल योजनेंतर्गत शिक्षण शास्त्रातील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम २00९ मधील कलम २३ (२) मध्ये शाळांमधील अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. सर्व व्यवस्थापनाच्या कायम विना अनुदानित, स्वयं अ र्थसहाय्यित शाळांमधील प्राथमिक अप्रशिक्षित शिक्षकांनादेखील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कूल योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर १५ स प्टेंबर २0१७ पर्यंत शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील पदविका प्राप्त करणे बंधनकारक आहे. यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे आवश्यक आहे. ३१ मार्च २0१९ पूर्वी अप्रशिक्षित शिक्षकांनी प्रशिक्षित व्हावे, त्यासाठी १५ सप्टेंबरपूर्वी प्रवेशासाठी अर्ज भरावे, असे आवाहन जि.प.चे प्रा थमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी केले.
जिल्हय़ात ९५ अप्रशिक्षित शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:23 AM
वाशिम: शिक्षण शास्त्रातील कोणतीही पदविका किंवा पदवी नसतानाही जिल्हय़ातील ९५ प्रशिक्षित शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षण शास्त्रातील पदविका किंवा पदवी प्राप्त करावी लागणार असून, शिक्षण शास्त्राच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी १५ सप्टेंबर २0१७ ही अंतिम मुदत आहे.
ठळक मुद्देप्रशिक्षित होण्याची शेवटची संधीअर्जासाठी १५ सप्टेंबर शेवटची मुदत