वाशिम, दि. १५- तब्बल ७१६ कोटी रुपये खचरून जिल्ह्यातून वाहणार्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी 'बॅरेजेस' उभारण्यात आले; मात्र बॅरेजेस परिसरात अद्याप विजेची प्रभावी सोय करण्यात आलेली नाही. यासंदर्भात महावितरणने शासनाकडे पाठविलेला ९६ करोड रुपयांचा प्रस्तावही लालफीतशाहीत अडकून असल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोर्याच्या दुभाजकावर येतो. जिल्ह्यात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे केली जात आहेत. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये या प्रकल्पांना ह्यसुप्रमाह्ण प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होऊन त्यात मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे. तथापि, सिंचनाच्या बाबतीत ह्यमाईलस्टोनह्ण काम ठरू पाहणार्या ह्यबॅरेजेसह्णच्या उपलब्धीमुळे शेकडो गावांमधील शेतकर्यांनी हरितक्रांतीचे स्वप्न रंगविणे सुरू केले आहे; मात्र सिंचनाकरिता लागणार्या विजेचा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे कोट्यवधी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या ह्यबॅरेजेसह्णची उपयोगिता शून्य ठरणार, ही देखील वस्तूस्थिती होय. ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवत महावितरणने फेब्रुवारी २0१६ मध्ये ह्यबॅरेजेसह्णस्थळी पुरेसा वीजपुरवठा करण्यासंदर्भात नियोजन करून ९६ करोड रुपये खर्चाचा सविस्तर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला. त्यानुसार, गणेशपूर, जयपूर आणि नारेगाव या तीन ठिकाणी ३३/११ ह्यकेव्हीह्णचे ३ वीज उपकेंद्र उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यावर ५ ह्यएमव्हीएह्णचे ६ ट्रान्सफार्मर आणि १00 ह्यकेव्हीएह्णचे ९४२ ट्रान्सफार्मर बसवावे लागणार आहेत. याशिवाय अडोळी आणि वाई येथे ५ ह्यएमव्हीएह्णचे २ अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, नव्याने तयार होणार्या उपकेंद्रापर्यंंत वीज पुरवठा करण्यासाठी ३३/११ ह्यकेव्हीह्णची विद्युत लाइन टाकण्यासह इतरही बरीच कामे केली जाणार आहेत. शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाचा सलग पाठपुरावा सुरू असून, मार्च उलटल्यानंतर हा प्रश्न निकाली निघण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळाले आहेत.- डी.आर.बनसोडेअधीक्षक अभियंता महावितरण, वाशिम.
९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव अडकला ‘लालफीतशाहीत’!
By admin | Published: March 16, 2017 3:04 AM