मंगरुळपीर-तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदनार होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, याकरिता सबंधित कर्मचाºयांना प्रशिक्षणही दिले आहे. निवडणूक प्रक्रीया शांतता आणी सुव्यवस्थेमध्ये सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस प्रशासनाचीही महत्वाची भूमिका असणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत सरपंचासह गटाला विजयी करण्यासाठी चांगलीच कसरत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने. तयारीच्या पृष्ठभूमीवर २६ आॅक्टोबर रोजीच सर्व कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर दाखल होणार आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये कोळंबी, सावरगाव, नांदगाव, अरक, माळशेलू, गोलवाडी, पिंपळगाव ईजारा, कळंबा बोडखे आणि जनुना बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ७७ उमेदवारांना निवडून द्यायचे असून, यातील सरपंच पदासाठी ५७, तर सदस्यपदासाठी २०४ अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीच्या दिवशी सदस्य पदाचे दोन अर्ज बाद झाले, तर अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सरपंचपदाचे २९ अर्ज, तर सदस्य पदांचे ६१ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता सरपंच पदासाठी २९, तर सदस्य पदासाठी १४१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामधील १८ सदस्य अविरोध निवडण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने १२० कर्मचारी तैनात राहणार असून, यावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्यासह नायब तहसीलदार सुभाष जाधव, नायब तहसीलदार एम. आर. पांडे, डी. एस. परंडे, बी. डी. बार्शीकर, पी. बी. जायभाये यांचे नियंत्रण असणार आहे.