लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून वाडी रायताळ, वारा जहाँंगीर आणि पांगराबंदी या प्रकल्पांची किरकोळ कामे बाकी आहेत. दरम्यान, पावसाळ्याचे पाणी या प्रकल्पांमध्ये साठविण्यात आल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून आगामी रब्बी हंगामात त्याचा फायदा शेतकºयांना होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी बुधवारी दिली.शासनाने विदर्भातील दुष्काळप्रवण व आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांमधील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याअंतर्गत विविध स्वरूपातील कारणांमुळे रखडलेल्या वाशिम जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्पांचा समावेश असून त्यासाठी २४८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. दरम्यान, ही कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुषंगाने ९ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अरक, उमरी, पारवा कोहर, गायवळ आणि स्वासीन हे पाच प्रकल्प जून २०१९ पर्यंत; तर उर्वरित ४ प्रकल्पांची कामे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केल्याची माहिती कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतील ९ प्रकल्पांची कामे पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 4:15 PM
वाशिम : बळीराजा जलसंजीवनी योजनेत समाविष्ट १८ प्रकल्पांपैकी फाळेगाव, पंचाळा, शेलगाव, वाकद, सुरकंडी आणि मिर्झापूर अशा सहा प्रकल्पांची कामे पूर्ण झाली.
ठळक मुद्दे ६ जिल्ह्यांमधील ६६ प्रकल्पांसाठी ३ हजार १०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. विविध स्वरूपातील कारणांमुळे रखडलेल्या वाशिम जिल्ह्यातील १८ सिंचन प्रकल्पांचा समावेश.