लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९६ ग्राम पंचायतींना ६७२ सौर पथदिवे पुरविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतींची १० टक्के रक्कम व ९० टक्के कृषी विभागाची रक्कम अशी एकूण ३२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.तांत्रिक बिघाडामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे, वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे ग्रामपंचायतचा वीजपुरवठा बंद होणे, भारनियमन व अन्य कारणांमुळे गावातील पथदिवे बंद राहण्याची शक्यता लक्षात घेता गावात अंतर्गत रस्त्यांवर सौर दिवे लावण्याची योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे राबविली जाते. यासाठी ग्रामपंचायतींना एकूण रकमेच्या केवळ १० टक्के हिस्सा भरावा लागतो. उर्वरीत ९० टक्के निधीची तरतूद कृषी विभागामार्फत केली जाते. सौर दिव्यांसाठी इच्छूक असलेल्या व १० टक्के रक्कमेचा भरणा करण्यास तयार असलेल्या ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले जातात. जिल्ह्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अपारंपारिक ऊर्जा कार्यक्षम पथदिवे योजनेतून कृषी विभागाला जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी ९६ ग्रामपंचायतींनी १० टक्के हिस्सा म्हणून तीन लाख २४ हजार ६६५ रुपयांचा भरणा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे केला. त्यानंतर कृषी विभागाने ९० टक्के अनुदान म्हणून २९ लाख २१ हजार ७६७ रुपये आणि जिल्हा परिषद स्तरावर जमा रक्कम १ लाख ८७ हजार २५२ रुपये असे एकूण ३१ लाख नऊ हजार १९ रुपये पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात आले. या रकमेतून ९६ ग्रामपंचायतींनी एकूण ६७२ सौर दिव्यांची खरेदी केल्याने, सौर दिव्यांची सुविधा गावात उपलब्ध झाली आहे. यामध्ये रिसोड व मालेगाव तालुक्यातील प्रत्येकी २२ ग्रामपंचायती, वाशिम तालुक्यातील १८, मंगरूळपीर तालुक्यातील १५, मानोरा ११ व कारंजा तालुक्यातील आठ अशा एकूण ९६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
९६ ग्रामपंचायतींत लागले ‘सौर दिवे’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:13 PM
वाशिम - जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९६ ग्राम पंचायतींना ६७२ सौर पथदिवे पुरविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामपंचायतींची १० टक्के रक्कम व ९० टक्के कृषी विभागाची रक्कम अशी एकूण ३२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
ठळक मुद्देकृषी विभाग ६७२ सौर दिव्यांसाठी ३२ लाखांची खर्च