कोरोनाला प्रतिबंध म्हणून लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. कारखेडा ग्रामपंचायतने गावाच्या सुरक्षेसाठी गावातील तब्बल ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेतल्याने हे गाव जिल्ह्यात अव्वल आहे. लसीकरण कॅम्पला भेट देऊन मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी गावच्या सरपंच सोनाली सोळंके यांनी लसीकरणासंदर्भात केलेले नियोजन कौतुकास्पद आहे, असे सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य निरीक्षक अधिकारी डाॅ. राजेंद्र मानके, डॉ. सुरेंद्र जगलपुरे, डॉ. ललित हेडा, डॉ. सोनल केळकर, कर्मचारी महेश खरे, सरकटे हे उपस्थित होते. या वेळी आरोग्य सेविका वनिता राठोड, जयश्री पंडित राठोड यांचा योग्य सेवा दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके, उपसरपंच अनिल काजळे, ग्रामसेवक अनिल सुर्ये, मंडळ अधिकारी एस. बी. जाधव, तलाठी भालेकर, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, माधुरी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चव्हाण, प्रदीप देशमुख, गणेश जाधव, मनोज तायडे यांची उपस्थिती होती.
कारखेडा गावात ९५ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:44 AM