शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

वाशिम जिल्हास्तरीय समाधान शिबिरात ९५४ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 1:44 PM

सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत ३ सप्टेंबर रोजी स्थानिक वाटाने लॉन येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समाधान शिबिरात तक्रारींचा पाऊस पडला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात रात्री ९.३० वाजेपर्यंत तब्बल ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या.शिबिराच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, धनंजय गोगटे, अनुप खांडे यांच्यासह सर्व तहसीलदार, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून ९५४ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये पांदण रस्ता अतिक्रमणमुक्त करणे, वाहिवाटीचा रस्ता, सिंचन विहिरी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, पाणीपुरवठा योजना, वीज जोडणी, घरकुल, औषधी साठा उपलब्ध नसणे आदी विषयांच्या तक्रारींचा समावेश होता. न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळता उर्वरित तक्रारींवर यावेळी सुनावणी घेण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टात सुनावणी घेणे आवश्यक आहे, अशी प्रकरणांची सुनावणी विहित कालमर्यादेत पूर्ण करून प्रकरणांचा निपटारा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.पांदन रस्ते, तसेच वाहिवाटीच्या रस्त्यांबाबतची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी तहसीलदार, तालुका भूमिअभिलेख कार्यालय व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देशही ना. राठोड यांनी दिले. मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये २०१८ मध्ये वादळी वाऱ्याने घरांचे नुकसान झाले. तेथील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदारांनी प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसल्याची तक्रार शिबिरात दाखल झाली होती. ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध ठेवण्याच्या सूचना ना. राठोड यांनी प्रशासनाला केल्या. 

अशा आहेत तालुकानिहाय तक्रारीसमाधान शिबिरासाठी वाशिम तालुक्यातून १२६, मालेगाव तालुक्यातून ५३, रिसोड तालुक्यातून ७१, मंगरुळपीर तालुक्यातून १३६, कारंजा तालुक्यातून ४३० व मानोरा तालुक्यातून १३८ अशा एकूण ९५४ तक्रारी दाखल झाल्या. शेतीसाठी रस्ता मागणीसाठी दाखल प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून निर्णय द्यावा व ही प्रकरणे निकाली काढावीत, अशा सूचना पालकमंत्री ना. राठोड यांनी केल्या. या शिबिरात रात्री उशिरापर्यंत तक्रारी दाखल करणे सुरूच होते.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय