लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. या मानामुळे जिल्हयातील एक मानाचा तुरा रोवल्या गेला.अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे ९९ वे अधिवेशन अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन कै. राम गणेश गडकरी नाटयनगरी नाटयनगरी रेशीम बाग मैदान नागपूर येथे २२ फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. या संमेलनात कै.सुरेश भट सभागृहात २३ फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय मराठी नाटय परिषद शाखा कारंजा या संस्थेची ‘राडा’ ही एकांकीका आयोजित करण्यात येणार आहे. राडा या एकांकीकेचे लेखक श्रीकांत एस. भाके असून दिग्दर्शक अंकित अरविंद जवळेंकर आहेत. निर्मिती सहाय्य नंदकिशोर कव्हळकर, श्रीकांत भाके व नाटयपरिषद कारंजाचे लाभत आहे. या एकांकीकेमध्ये मेघा कोटक, सुयश सखाराम देशपांडे, चारुशिला निशीकांत परळीकर, अश्विनी ग. मिसाळ, तुषार काकड, श्रध्दा रगडे, विजय करुले, संगिता इंदाने, अंकित जवळेकर, प्रज्ञा खेडकर, अंकुश टोंग, आकाश जाधव, समिर भेराने या कलाकारांचा समावेश आहे.
९९ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनात कारंजाच्या नाटयपरिषदेची एकांकीका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:41 PM