नंदकिशाेर नारे
वाशिम : आपल्या न्याय व हक्कासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्य व गुरांढाेरासह २२ ऑगस्ट राेजी मंगरुळपीर तहसील कार्यालयासमाेर आमरण उपाेषणास सुरुवात करण्यात आली.
मंगरुळपीर तालुक्यातील आजगाव येथील रामेश्वर हरिभाऊ गांजरे यांनी शेतातील खुना कायम ठेवणे व दाेषीविरुध्द कारवाईच्या मागणीसाठी हे उपाेषण सुरु केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसह संबधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, आजगाव येथील गट नंबर ६३/१, ६३/२ मधील शेताच्या खुणा व हद्द कायम करत असताना विरोधकांनी त्यांचा आणि माझ्या शेतीचा कुठलाही संबंध नसताना अडचण निर्माण केली .
यावेळी बंदोबस्तात आलेल्या पोलिसांनी विरोधकांवर गुन्हे दाखल न करता त्यांना पाठीशी घातले. त्यामुळे बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांवर व विरोधकावर कार्यवाही करावी व मला माझा हक्क व न्याय मिळवून देऊन शेतातील हद्द व खुणा कायम करून देण्यात याव्यात .अशी मागणी गांजरे यांनी केली. तसेच शासन आपल्या दारी तर हा उपक्रम राबवीत असताना दुसरीकडे शेतकरी शासनाच्या दारी उपाेषण करीत असल्याची खंतही त्यांनी निवेदनातून व्यक्त केली.